मनोज जरांगेना विचारण्यात आले 11 प्रश्न, फडणवीस- ठाकरेंचा उल्लेख.. मराठा समाजाचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आक्रमक असून सरकारवर आणि खास करून देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. जरांगे पाटलांच्या विरोधामुळे लोकसभेत भाजपाला मोठं नुकसान सोसावं आणि महाविकास आघाडीला फायदा झाला, त्यामुळे जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचा माणूस आहे असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. एकीकडे हे सगळ काही सुरु असताना सोलापूरमधील बार्शीतील एका मराठा नेत्याने आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावर अजूनही उत्तरे न मिळाल्याने बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले पण त्यांनी उत्तरे दिले नाहीत मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला. पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून रात्रदिन राबला आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाचा विरोधात तुम्ही बोलला, मात्र राजेंद्र राऊत म्हणजे बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ आहे, त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे ही तोंड आहे असा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी दिला.

मनोज जरांगेना विचारण्यात आले ११ प्रश्न कोणते?

महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडूनही आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.
मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.
दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.
दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?
दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.
अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदार निश्चित करा, अन्यथा आपल्यासहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.