Sunday, April 2, 2023

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळणार? बोम्मईंची घोषणा नेमकी काय?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी गावांसाठी जारी केलेला निधी रोखणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे.

नेमकं घडलं काय ?

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील एकूण ८६५ गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ५४ कोटींचा निधी जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद कर्नाटकात उमटले. याच मुद्द्यावरून कर्नाटकातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना घेरलं. आपल्या राज्यातील गावांसाठी इतर राज्यातील सरकार निधी देत असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर बोम्मई यांनी यावर उत्तर देत आपण महाराष्ट्र सरकारचा निधी रोखू असं म्हंटल आहे.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, मला विरोधकांकडून शिकण्याची गरज नाही. महाराष्ट्राने येथे निधी निधी दिला तर मी राजीनामा का देऊ? महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर अशा ठिकाणांसाठी आम्ही सुद्धा पैसे दिले आहेत कारण या ठिकाणी कर्नाटकचे लोक जात असतात. तरीही मी या प्रकरणात लक्ष घालेन आणि हा निधी थांबवण्यासाठी आम्ही पावलं उचलू असं बोम्मई यांनी म्हंटल. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद उफाळण्याची शक्यता आहे.