अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; ‘या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिक्षा नावाच्या डिझाईनवर मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट सुद्धा दिली होती. आपल्या वडिलांसंदर्भात सुरू असलेल्या एका खटल्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटींच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिली होती.

एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी पुढे म्हटले की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरून त्यांना पाठवले. त्यानंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांकडून अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र चक्क गृहमंत्र्यांच्या पत्नीलाच लाच देण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे