हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bastar The Naxal Story) बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने ‘द केरला स्टोरी’ या सिनेमात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. या सिनेमाने अदा शर्माला विशेष प्रसिद्धी दिल्यानंतर आता लवकरच तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा आता पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एका गंभीर आणि तितक्याच धाडसी कथानकावर आधारलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘द केरला स्टोरी’नंतर अदा शर्माला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. अशातच सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘बस्तर- द नक्सल स्टोरी’ची (Bastar The Naxal Story) घोषणा केली असून नुकताच या सिनेमाचा पहिला टिझर आउट झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. यानंतर आता सिनेमाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माहितीनुसार, या चित्रपटात अदा शर्मा ही मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिला पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘बस्तर – द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या सिनेमात अदा शर्मा हि आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या सिनेमाच्या टीझरमध्ये अदा भाषण देताना दिसते आहे. यामध्ये ती पाकिस्तासोबत झालेल्या युद्धात शहिद झालेले भारतीय जवान आणि आपल्याच देशात नक्षलवादी लोकांनी केलेली आपल्या जवानांची हत्या यावर भाष्य करते आहे. जेएनयुसारख्या विद्यापीठात या कृतीचे सेलिब्रेशन करण्यात आले याही मुद्द्यावर ती परखडपणे बोलताना दिसते आहे.
हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील आणखी एक संवेदनशील सिनेमा ठरणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच या चित्रपटातही त्यांनी बऱ्याच गोष्टींचा दावा केल्याचे समोर आले आहे. या सिनेमाच्या कथानकातून डाव्या वामपंथी लोकांची अन् त्यांच्या छुप्या अजेंड्याची पोलखोल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.