हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, २०२१च्या नव्हे, तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील.
२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Board of Control for Cricket in India (BCCI) approves 10-team IPL from 2022, in its annual general meeting today pic.twitter.com/AGEEFvx5Ke
— ANI (@ANI) December 24, 2020
आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. PTIनं दिलेल्या वृत्तानुसार २०२२च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशावर सर्व सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’