हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक टीममध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांचं प्ले ऑफ मधील स्थान जवळपास नक्की झालं असलं तरी चौथ्या स्थानासाठी बाकी 5 संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या प्ले ऑफचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
असे आहे प्ले-ऑफचे वेळापत्रक
क्वालिफायर 1 – 5 नोव्हेंबर (दुबई)
एलिमिनेटर- 6 नोव्हेंबर (अबुधाबी)
क्वालिफायर 2- 8 नोव्हेंबर (अबुधाबी)
फायनल-10 नोव्हेंबर (दुबई)
आयपीएलच्या ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 14 गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या 3 संघांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ 1 विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्ले ऑफसाठी 3 संघ जवळपास निश्चित आहेत. मात्र 4 थ्या क्रमांकासाठी कोलकाता, पंजाब आणि राजस्थान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पंजाबने या स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी 3 संघांमध्ये तगडे आव्हान असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’