कोरोनामुळे आयपीएल रद्द होणार ??? बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतात की…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या 13व्या सीझनवर पुन्हा एकदा कोरोना संकटाचं सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने यूएईमध्ये 13व्या सीझनच्या आयोजनाचा निर्णय घेतला. परंतु, स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली.

चेन्नईचा संघ एक आठवडाआधी दुबईत दाखल झाला आहे. त्यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनामुळे आयपीएल रद्द करण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर आपलं मौन सोडलं आहे.

सौरव गांगुली म्हणाले की,” चेन्नई सुपर किंग्समधील खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याप्रकरणी मी काहीच करू शकत नाही. आता आम्ही आयपीएलचं 13वं सीझन 19 सप्टेंबरपासून सुरु होणार की नाही? याबाबत काहीच सांगू शकत नाही. ”

सौरव गांगुली यांनी सर्व काही ठिक होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,

” आम्ही अशी अपेक्षा करत आहोत की, इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन व्यवस्थित पार पडेल. आयपीएलचा संपूर्ण कार्यक्रम बराच वेळ सुरु राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व काही सुरळीत पार पडेल अशी आशा करू शकतो. ”

आयपीएल सुरु होण्यास आता केवळ 20 दिवसांचा कालावधी उरला आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीने अद्याप सामन्यांचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. बीसीसीआयने एक महिन्याआधी घोषणा केली होती की, आयपीएलचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरमध्ये करण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment