कोलकाता । बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. भावाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गांगुलीने स्वत:ची देखील कोरोना चाचणी केली होती. आता त्याच्या चाचणीचा अहवाल आहे.
सौरव गांगुलीचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गांगुलीच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. गांगुलीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तरी त्याने धोका न पत्करता कोरोना चाचणी केली होती. त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गांगुली घरातूनच बीसीसीआयचा सर्व कारभार चालवत आहे. स्नेहाशीष यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गांगुलीसह बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभिषेक डालमिया यांनी देखील स्वत:हून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनामुळे बीसीसीआय अधिकाऱ्यांप्रमाणे भारतीय संघातील खेळाडूही घरीच थांबले आहेत. भारतातील सध्याची परिस्थीती पाहता कोरोना स्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. दरम्यान, कालच बीसीसीआयने आयपीएलची अधिकृत घोषणा केली होती. गांगुली व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठका घेत ही घोषणा केली. बीसीसीआयने या वर्षी १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. IPLच्या आधी भारतीय संघ कदाचित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. त्यानंतर आयपीएल आणि वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”