जर तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर यातील एक पर्याय निवडा – मिळेल भरपूर नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा आपल्या देशात सर्वात सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूकीचा पर्याय आहे. जिथे ग्राहक आपले पैसे गुंतवतात आणि नफा कमावतात. बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे त्याबद्दल जाणून घेउयात.

रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट: रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ग्राहकांना एका निश्चित कालावधीसाठी त्यांच्या पैशाची निश्चित केलेल्या एका व्याज दरासाठी गुंतवणूक करावी लागते. रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी हा 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतचा असतो. गुंतवणूकदारांकडून निवडला जाणारा हा सर्वात लोकप्रिय असा एफडीचा पर्याय आहे. जवळजवळ प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना या रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा देते. यामध्ये ग्राहक कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच एफडी काढू शकतो.

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटः जर तुम्हीही कर वाचवण्यासाठी गुंतवणूकीचे आणखी चांगले साधन शोधत असाल तर फिक्स्ड डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. बरेच लोक टॅक्स सेव्हिंगच्या उद्देशाने गुंतवणूकीच्या या साधनांचा वापर करतात, कारण यातील जोखीम ही स्टॉकपेक्षा कमी असते. एखादी व्यक्ती या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी बँकेमार्फत गुंतवणूक करू शकते, मात्र सहकारी आणि ग्रामीण बँकांमध्ये या एफडीच्या गुंतवणूकिचा पर्याय नसतो. या डिपॉझिटचा लॉक-इन कालावधी हा 5 वर्षांचा असतो. या एफडीमध्ये अकाली पैसे काढण्याची आणि कर्जाची परवानगी नसते.

विशेष मुदत ठेव / न पैसे काढण्याची एफडी: ही एफडी सामान्यत: एका विशिष्ट कालावधीसाठी दिली जाते, मग ती कुठलीही असू शकते. जसे की 290 दिवस किंवा 390 दिवस इ. यामध्ये एफडी पूर्ण होण्यापूर्वी ती काढता येत नाही. यावरील व्याज दरही बाकीच्यांपेक्षा जास्त असतो.

सीनियर सिटिजन फिक्स्ड डिपॉझिट: ही सीनियर सिटिजन फिक्स्ड डिपॉझिट योजना 60 वर्षांवरील व्यक्तींना हे एफडी खाते उघडण्यास परवानगी देते. या डिपॉझिटवर नियमित व्याज दरापेक्षा सुमारे 0.50% अधिक व्याज दिले जाते.

नियमित उत्पन्न फिक्स्ड डिपॉझिट: उत्पन्नाचे स्रोत म्हणून एफडीवर अवलंबून असलेल्यांसाठी ही डिपॉझिट अत्यंत योग्य आहे. ही एफडी आपल्याला मासिक किंवा तिमाही आधारावर नियमित देयकाचा पर्याय निवडण्याची परवानगी देतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment