हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली आहे. विराट कोहलीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली रोहित शर्मा हा भारताचा एकदिवसीय आणि T20 क्रिकेटचा कर्णधार असेल. याच दरम्यान एक नवी माहिती समोर येत असून रोहित शर्माच्या ‘त्या’ अटीमुळेच विराटचे एकदिवसीय कर्णधारपद गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्यापूर्वी बीसीसीआयसमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे वन डे संघाचे कर्णधारपद दिल्यावरच, ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी स्वीकारेन, अशी होती. त्यामुळेच बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही विराटला टी-२०चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. पण त्याला हे पद नको होते. त्यानंतर निवड समितीने असा निर्णय घेतला की मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असणे योग्य नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने ठेवलेल्या अटीमुळे बीसीसीआयला काही करता आले नाही. रोहितला वनडे आणि टी-२० या दोन्ही संघाचे कर्णधारपद हवे होते.