सावधान ! औरंगाबादेत पुन्हा वाढतोय कोरोना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता या आकड्यामुळे आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सुमारे 32 हजार तर दुसऱ्या लाटेत 40 हजार जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. यातील 1978 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती. त्यात नोव्हेंबर महिन्यापासून ओमीक्रॉन विषाणू समोर आला. त्यानंतर तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे.

शहरात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले असले तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. पण थंडी वाढताच गेल्या मागील चार दिवसापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी 15 व गुरूवारी 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी नवीन वर्षे घरातच कुटुंबासमवेत साजरे करावे, असे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले.

Leave a Comment