काळजी घ्या ! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ,पहा नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

औषधांचा अतिवापर देखील घातक

यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या आणि पावसाळा येत आहे त्यामुळे या काळात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना वरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा तसेच. सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोरोनाचा आजार अंगावर अजिबात काढू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोना हा आधार अजिबात अंगावर काढण्यासारखा आजार नाही. तो अंगावर काढू नका तो आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका. राज्यात कोरोना नंतर बुरशीजन्य म्युकोर मायकॉसिस रोगाचा प्रसार वाढत आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्त्वाचं कारण असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असं व्हायला नको बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचार पद्धती निश्चित व्हायला हवी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Comment