सावधान!! ‘ही’ 5 लक्षणे देतात किडनी खराब होण्याचे संकेत

Kidney
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य किडनी करते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर किडनी फेल होण्याची समस्याही उद्भवू शकते. प्रामुख्याने किडनी खराब होण्याची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. आज आपण जाणून घेऊया किडनी खराब होण्याची काही लक्षणे….

१) शरीरात सूज येते –

जेव्हा किडनीच्या कार्यप्रणालीत कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा शरीरातून बाहेर न निघणारी घाण आणि द्रव समस्या निर्माण करतात. ज्यामुळे शरीरावर सूज येते. ही सूज आपल्या हाताना, पायांना,चेहऱ्याला आणि डोळ्याखाली येऊ शकते. असे झाल्यास जास्त उशीर न करता त्वरित डॉक्टरांना दाखवा.

२) त्वचेत कोरडेपणा-

जर तुमच्या त्वचेत सातत्याने कोरडेपणा येत असेल हे सुद्धा किडनी खराब होण्याचे लक्षण मानले जाते. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम नसते तेव्हा असे होते.

३) कमी किंवा जास्त लगावी होणे –

लगवीचे प्रमाण अचानक कमी किंवा जास्त होणे हे किडनीच्या रोगाचे लक्षण आहे. कधी कधी रात्री जास्त वेळा लगवीला जावं लागत. याशिवाय किडनी रोग असलेल्या व्यक्तींच्या लघवीचा रंग गडद असतो. अनेक वेळा रोग्यांना लघवी आल्यासारखे वाटते परंतु टॉयलेटमध्ये गेल्यावर लघवी होत नाही.

४) थकवा आणि अशक्तपणा –

सतत थकवा जाणवणे आणि अशक्तपणा वाटणे हे सुद्धा खराब किडनीचे लक्षण आहे. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे, व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो आणि चक्करही येते. ही लक्षणे रक्ताची कमतरतेमुळे आणि शरीरात घाण साचल्यामुळे उद्भवू शकते.

५) उलट्या होणे-

किडनीच्या समस्येमुळे उलट्या होणे ही लक्षणे सामान्य आहेत. उलट्या थांबण्यासाठी औषधे घेतल्यानंतरही जर असाच त्रास सुरु होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घ्या.