चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या शक्तिनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या एक अस्वल धुमाकूळ घालत आहे.

या वसाहतीच्या बाजूलाच मोठी कोळसा खाण असून मातीचे ढिगारे असलेल्या या जागेवर काटेरी झुडपांची दाटी आहे. मुबलक प्रमाणात खाद्य व पाणी उपलब्ध असल्याने अस्वलीचा वावर या भागात आढळून आला आहे.

मात्र आता दिवस वर्दळीच्या वेळी अस्वल राहत्या घरांच्या सभोवताल फिरत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. ही अस्वल या भागात सध्या सतत दिसत असल्याने महिला,शालेय विद्यार्थी व एकटा-दुकटा नागरिक हे लक्ष्य ठरू शकतात. या अस्वलीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातील नागरिक करत आहेत.

Leave a Comment