सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात कराड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड हंगाम संपल्यानंतर मूळ गावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांना महामार्गावर काही जणांनी मारहाण केली. गोरक्षक असल्याचे सांगून अडवून त्यांना जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ऊसतोड मजुरांना मारहाण करणाऱ्या गोरक्षक संकेत शिंदे याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमध्ये दाटीवाटीने 35 हुन अधिक म्हशी आणि 3 गाईचा समावेश होता. दरम्यान जनावरांचे हाल केल्याप्रकरणी देखील साईनाथ फुंदे आणि मजुरांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकमधील जनावरे तसेच मारहाणीचा नेमका प्रकार काय आहे. याचा तपास सातारा शहर पोलीस करत आहेत. ट्रक (क्रमांक एमएच-16-सीसी- 7267) यामधून जनावरांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे जनावरांसह ट्रक सातारा पोलिस ठाण्यात नेण्यात आला होता.