व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वडोली निळेश्वर येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण

कराड | घरासमोर लावलेली दुचाकी बाजूला लावण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्याच्यात मारहाण झाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सतिश बबन यादव (वय- 55, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16/1/2023 रोजी रात्रौ 10.00 वाजणेचे सुमारास फिर्यादी सतिश यादव घरात असताना शेजारील सुनिल बाळासो पवार यांनी बाहेर बोलविले. यावेळी घरासमोर लावलेली तुमची मोटारसायकल ज्युपीटर स्कुटी बाजूला लावा असे म्हणाले. यावर सतिश यादव म्हणाले, घरासमोर असलेले सामाईक जागेत वाकड्या तिकड्या मोटारसायकल लावलेल्या आहेत. त्या सरळ लावल्या तर माझी मोटारसायकल तेथे लावता येईल असे म्हणाले. याचवेळी अचानक शेजारी राहणारा ओंकार लालासो शेवाळे हा हातामध्ये आचारी कामाचे लोखंडी उलथणे घेवून आला व त्याने फिर्यादीच्या कमरेवर डावे बाजूस लोखंडी उलाथणे मारुन जखमी केले.

ओंकार शेवाळे याने माझे नाव का तु घेतलेस असे म्हणुन फिर्यादीला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेथेच असणारे सुनिल बाळासो पवार तसेच फिर्यादीची पत्नी मंगल, मुलगी सौ. प्रिया महेश चव्हाण यांनी भांडणे सोडवासोडव केली. त्यानंतर ओंकार लालासो शेवाळे हा तेथून निघून गेला. जखमी सतिश यादव यांच्यावर कॉटेज हॉस्पीटल कराड येथे औषध उपचार केल्यानंतर कराड पोलीस ठाणेस तक्रार दिली.