आ. शशिकांत शिंदेच्या “त्या” वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी आणले घोडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

काही दिवसांपूर्वी किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना आमदार महेश शिंदे यांना टोला लगावला होता. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भर सभेत एका एकाला *** लावण्याची भाषा केल्याने जनमानसात हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, आज किसनवीर कारखान्यात सत्तांतर करून सत्ता मिळवताच आ. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क घोडा आणत, गुलालाची उधळण करीत घोषणा दिल्या.

साताऱ्या जिल्ह्यातील बातम्यांसाठी आमचा Whatsapp ग्रुप JOIN करा

आ. शशिकांत शिंदे यांनी *** लावण्याची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत चांगलाच रंग चढताना दिसून आला होता. आज झालेल्या निकालानंतर आ. शिंदेच्या कार्यकर्त्यांनी चक्क घोडा आणला.

किसनवीर कारखाना निवडणूक सोसायटी मतदार संघात आमदार मकरंद आबा पाटील आणि त्यांचे बंधू नितीन काका पाटील यांच्याकडे कारखाना आला असून कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या शब्दाला धरून रस्त्यावर दोन घोडे घेऊन घेऊन घोषणाबाजी केली. लागला ***.. लागला *** असे कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन रस्त्यावर जल्लोष केला.

नक्कीच*** लागेल ः आ. शशिकांत शिंदे

आ. शशिकांत शिंदे यांनी भरसभेत एका एकाला*** लावणार असे म्हटले होते, त्यावर जीभ घसरली का असे आमदार शशिकांत शिंदे यांना विचारण्यात आले. तेव्हा शशिकांत शिंदे यांनी सांगितले होते. माझी जीभ कधीच घसरत नाही, जिल्ह्यातील काही लोकांना पुढील काळात नक्कीच *** लागेल, असे त्यांचे वक्तव्य आजच्या निकालामुळे खरे झाले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. आ. महेश शिंदे यांचे नाव घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.