बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केली आहे. या मारहाणीप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडली आहे.
या प्रकरणी संगीता तुपसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे याच्या विरुद्धही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
संगीता तुपसागर या पीडित महिलेच्या मानलेली सासू आहेत. त्यांच्या सांगण्यावरून आरोपी पती भुजंग भुतावळे याने आपल्या पत्नीला मारहाण केली आहे. यानंतर पीडित महिलेने पोलिसांत आरोपी संगीता तुपसागर आणि पती भुजंग भुतावळे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. आरोपी संगीता तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.