आंबनेळी घाटात मधमाश्यांचा वाहनचालकांवर हल्ला ः अनेकजण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

प्रतापगड – पोलादपूर जाणाऱ्या मार्गावरील आंबनेळी घाटात आग्यामहूच्या मधमाश्यांनी अनेक वाहनचालकांना चावा घेतला आहे. आग्यामहूच्या मधमश्यांनी चावा घेतल्याने अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली असून वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण आहे.

आंबनेळी घाटात बुधवारी सकाळी आग्यामहूच्या मधमाशा घोघावत फिरत होत्या. यावेळी कुठेतरी घाटातील महू उठल्याने सर्वत्र मधमाशा फिरत होत्या. या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्यावर त्यांनी हल्ला केला. शेकडो मधमाश्यांच्या पोळाने अनेकांना फोडले. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवरही मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जखमींना रूग्णालयाकडे नेण्यात आले आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यात वाहनचालक जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

You might also like