कारमध्ये एकटे असला तरी मास्क लावणे बंधनकारक

नवी दिल्ली | देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरली आहे. म्हणूनच सरकार कडून मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग चे पालन करा अशा सूचना वारंवार करण्यात येत आहेत. आता दिल्ली उच्च न्यायालयाकडून एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आले आहे की मोटर कार मधून अगदी एकटे जात असताना देखील तोंडावर मास्क लावणं आवश्यक आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी हे स्पष्ट करण्यात आलं.

याबाबत बोलताना न्यायमूर्ती प्रतिभा सिंह म्हणाल्या, कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे कार मध्ये मास्क घालणे आवश्यक आहे. कार मधून वीना मास्क जात असलेल्या सौरभ शर्मा नावाच्या वकिलांना दंडा विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.

यावर न्यायमूर्ती सिंह यांनी मास्क हे सुरक्षा कवच आहे. अगदी तुम्ही एकटे जात असाल तरी मास्क लावल्यास बिघडते कुठे अशी टिप्पणी त्यांनी केली. गेल्या काही काळात कोरोनाचे संकट वाढले आहे व्यक्तीने लस घेतली असली किंवा नसली तरी त्यांना मास्क घातला पाहिजे. कोरोना पासून वाचण्यासाठी किमान इतके तरी तुम्ही करू शकता असेही न्यायमूर्ती सिंह यांनी सांगितलं.

जेव्हा कार सिग्नल वर थांबलेली असते तेव्हा बऱ्याचदा चालक दरवाजाच्या काचा खाली करतात अशा स्थितीत आजूबाजूच्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी टिप्पणी न्यायालयाने केली. केंद्र सरकारने कार मधून एकटे जात असताना मास्क लावण्याबाबत नियम केलेला नसला तरी प्रत्येक राज्य आपल्या सुविधा नुसार याबाबत नियम तयार करू शकते असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला होता.

दरम्यान विना मस्त प्रवास करणाऱ्या आणखी दोन लोकांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांनाही दिलासा देण्यासाठी न्यायालयाने नकार दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like