हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beetroot Benefits) उत्तम आरोग्य हे केवळ व्यायामाने मिळत नाही. तर यासाठी तुमचा आहार देखील चांगला आणि सकस असावा लागतो. आपला आहार आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतो. गेल्या काही काळात मधुमेह, पोटाच्या समस्या, मेंदूचे बिघडते स्वास्थ्य आणि कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. अशा रुग्णांसाठी त्यांच्या आहारात बीटाचा समावेश करणे गरजेचे आहे.
अनेक लोकांना सलाडमध्ये बीट खाणे आवडत नाही. (Beetroot Benefits) मात्र, हे फळ दिसायला आकर्षक, चवीला उत्तम आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगले फायदे देणारे आहे. आज आम्ही तुम्हाला बीट खाण्याचे फायदे सांगणार आहोत. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःहून बीट खाण्यास सुरुवात कराल.
बीटातील पोषक गुणधर्म
बीटात जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या पोषक तत्वांसह प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. या पोषक तत्त्वांमुळे बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Beetroot Benefits) जाणून घ्या फायदे खालीलप्रमाणे:-
1. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
बीट हे नायट्रेट्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे बीटचे सेवन केल्यावर नायट्रेट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. जे आपल्या शरीरातील धमन्यांना रुंद करते. शिवाय बीटातील फोलेट हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.
2. पचन संबंधित समस्या दूर होतात (Beetroot Benefits)
बीटातील फायबर हे पचनासंबंधित समस्यांना दूर करते. त्यामुळे पचन, बद्धकोष्ठतासारख्या अनेक समस्या कमी होतात.
3. मधुमेह आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो
बीटातील अनेक पोषक गुणधर्म हे पोटाच्या समस्या दूर करतात. शिवाय बीटाचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो.
4. शारीरिक ताकद मिळते
बीटचे सेवन केल्यास भरपूर ताकद मिळते. (Beetroot Benefits) कारण बीटाचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजन वाढते आणि ऍथलेटिक कामगिरी सुधारते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी २ तास आधी बीटरस घेऊ शकता.
5. मेंदूचे स्वास्थ्य सुधारते
मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. बीटातील नायट्रेट्स मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतात. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचे स्वास्थ्य देखील नीट राहते.
6. रक्तवाढीसाठी मदत करते
बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे बीट खाणे हे रक्तवाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Beetroot Benefits) बीटाचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिनची मात्रा सुरळीत होते. शरीरात रक्ताची अधिक कमतरता असेल आर शेंगदाणे आणि गुळासोबत बीट खाणे चांगले असल्याचे तज्ञ सांगतात.
चांगल्या फायद्यांसाठी नियमित किती बीट खावे?
तज्ञ सांगतात की, तुम्ही दिवसा किंवा दुपारच्या जेवणानंतर बीटाचे सेवन करू शकता, दैनंदिन जीवनात नियमित स्वरूपात १३६ ग्रॅम बीट म्हणजे १ कप बीटाचे काप खाणे पुरेसे आहे. (Beetroot Benefits) तसेच जर तुम्हाला बीटाचा रस आवडत असेल तर दररोज २०० मि.ली. घेणे फायदेशीर ठरेल.