FD करण्यापूर्वी ‘या’ बँकांचे नवीन दर तपासा, नेहमी फायद्यात रहाल …!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक चांगला पर्याय मानत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आणल्या होत्या. या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे म्हणजेच तुम्ही आता मार्च 2022 पर्यंत जास्त व्याजदराचा लाभ घेऊ शकता.

SBI ‘Wecare Deposit’
SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘Wecare Deposit’ विशेष FD योजना आणली आहे. आता तुम्ही मार्च 2022 पर्यंत जास्त व्याजदराचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्वसामान्यांना लागू होणाऱ्या दरांवरून 80 बेसिस पॉइंट जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष FD योजनेअंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट केल्यास, FD वर लागू होणारा व्याज दर 6.20 टक्के असेल.

ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून जास्तीच्या कालावधीसाठी डिपॉझिट्स वर 30 बेस पॉइंट अतिरिक्त प्रीमियम व्याज मिळते. पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या रिटेल फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल फिक्स्ड डिपॉझिटवर 0.80 टक्के (0.50 +0.30) अधिक व्याज मिळेल.

HDFC Senior Citizen Care
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा सुरू केली. बँक या ठेवींवर 0.75 टक्के जास्त व्याज देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर अंतर्गत FD केली तर त्यावर लागू होणारा व्याज दर 6.25% असेल.

ICICI Bank Golden Years
ICICI बँकेने ICICI बँक गोल्डन इयर्स योजना सादर केली आहे, ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना आहे. बँक या योजनेत 0.80 टक्के जास्त व्याज देत आहे. ICICI बँक गोल्डन इयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याजदर देत आहे. या योजनेचा लाभ 08 एप्रिल 2022 पर्यंत घेता येईल.

Leave a Comment