निकालाआधी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर झळकले : कोल्हापूरात काॅंग्रेसची 10 हजारांची आघाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या आठही फेऱ्यात काॅंग्रेसच्या जयश्री कदम आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्या घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. कॉंग्रेसकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम हे दोन उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. आठव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 9 हजार152 म्हणजे जवळपास 10 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. यासाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र निकालाआधीच बावड्यात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकले आहेत. यात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आठव्या फेरीत काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी 9 हजार 152 मतांची आघाडी घेतली आहे. आठव्या फेरीत श्रीमती जाधव यांना 3 हजार 632 तर भाजपचे सत्यजित कदम यांना 2 हजार 431 मते मिळाली. सातव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 33 हजार 993 तर सत्यजित कदम यांना 24 हजार 841 मते मिळाली आहेत.

Leave a Comment