महाबळेश्वर प्रतिनिधी । बेल एअर संस्थेने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव, तापोळा ही आरोग्य सेवा शासनाकडून चालविणेस घेतली आहेत. या बाबत कांदाटी, कोयना, सोळशी विभागात प्रचंड नाराजी असून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसलेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीमध्ये बेल एअर च्या कामाचे वाभाडे काढले असून देखील त्यांच्या कारभारात काही सुधारणा झाली नाही. यासाठी अचानक पंचायत समितीचे उपसभापती संजुबाबा गायकवाड, गट विकास अधिकारी नारायण घोलप,तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश कदम ,सहा गट विकास अधिकारी रवींद्र सांगळे यांनी आरोग्य विभागाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत तळदेव व तापोळा आरोग्य केंद्रास भेट दिली. Bel Air Hospital
भेटी दरम्यान दोन्ही केंद्रात अनेक त्रुटी आढळून आल्या असून तशा नोंदी घेणेत आल्या आहेत. दोन्ही केंद्रात २ डॉक्टर व इतर स्टाफ नियुक्त केला असून दोन पैकी एक डॉक्टर अनियमित पणे हजर आहेत. एक डॉक्टर तर बेल एअर, पांचगणी येथे कार्यरत आहे. इतर स्टाफ पैकी काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे त्या ठिकाणी इतर उप केंद्राचे कर्मचारी कामासाठी वापरले जात आहेत. सौंदरी ची आरोग्य सेविका तापोळा येथे कार्यरत आहे. म्हणजेच त्या ठिकाणी टाळा लावला आहे. तसेच पारूट येथील आरोग्य सेवक तळदेव येथे असून पंचायत समिती मासिक सभेला व इतर कामासाठी हीच व्यक्ती उपस्थित राहते. या वरून दोन्ही ठिकाणी असणारा स्टाफ व उपकेंद्रातील स्टाफ ह्यांचे मर्जीनुसार कामकाज करीत आहे. कोणत्याही बदलाची अगर अंतर्गत स्टाफ बदली ची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयास दिली जात नाही.
तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अखत्यारीत कांदाटी विभागातील सर्व गावे येत असून वाघावळे येथे असणारा आयुर्वेदिक दवाखाना बेल एअर ने कोणताही वैद्यकीय अधिकारी न देता बंद ठेवला होता. त्याचा फार मोठा तोटा या विभागातील जनतेला सोसावा लागला आहे. या विभागात असणारे आमचे लोकप्रतिनिधी सौ प्रणिता जंगम यांनाही काही माहिती दिली जात नाही पंचायत समिती सभापती सौ अंजना कदम यांनाही माहिती दिली जात नाही,प्रगती, अडचणी सांगितल्या जात नाहीत,रुग्ण कल्याण समितीच्या सभा कागदोपत्री घेतल्या जात आहेत,पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांना अनेक विषयापासून बाजूला ठेऊन मनमानी कारभार सुरू आहे,त्यामुळेच या विभागातील जनता आता पूर्वी प्रमाणे ही आरोग्य केंद्रे शासनाने चालवण्यासाठी घ्यावीत अशी एकमुखी मागणी करीत आहेत, कोणत्या तरी दानशूर व्यक्ती किंवा संस्थेकडून पाण्याच्या योजना किंवा इतर योजना वाडी वस्तीला देऊन मासिहा बनण्याचा आणि सामाजिक काम दाखविणेचा प्रयत्न बेल एअर करीत आहेत,हे आता जनता सहन करणार नसून याबाबत लवकरच सर्व पदाधिकारी एकत्र येऊन विभागाचे आमदार मकरंद आबा पाटील यांचेशी चर्चा करून पुढील कार्यवाही करणार आहोत अशी माहिती गायकवाड यांनी दिली