सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या या मोहिमेमध्ये गड किल्यांच्या मोठा सहभाग होता. राज्य आणि देशातील जनतेला या गड किल्यांचे मोठे अप्रूप आहे. या गड किल्यांची माहिती घेण्यासाठी , त्यांचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी असंख्य पर्यटक , नागरिक या ठिकाणी भेटी देत असतात. मात्र या गड किल्यांचे परदेशातील नागरिकांना देखील मोठे अप्रूप आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी वारंवार भेटी देत असतात.
सध्या असाच एक दुर्गवेडा परदेशी पर्यटक सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये गड किल्यांना साद घालत भटकत आहे. ‘पीटर’ असे या पर्यटकाचे नाव असून तो मुळचा बेल्जीयम या देशातील आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या तब्बल २०० गड किल्यांवर फिरण्याचा त्याचा मानस आहे. सध्या तो सातारा जिल्ह्यामध्ये असून ‘सलोटा’ किल्यावर जाण्यासाठी त्यांनी तयारी चालू आहे. सध्या या मोहिमेतील ‘सलोटा’ हा त्यांचा ७७ वा किल्ला आहे. दरम्यान दोन महिन्यांमध्ये तब्बल २०० गड – किल्ले सर करण्याचा त्यांचा मानस आहे.