सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील जावली तालुक्यातील तापोळा विभागात बेंदूर सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशीच्या दिवशी बेंदूर सण साजरा करण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. त्यानुसार जावळी तालुक्यातील आपटी गावातील 100 बैलजोड्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी तापोळा विभागातील तापोळा, फुरूस, हातरेवाडी , मांटी, आपटी येथील ग्रामस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात बेलूर सण साजरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून अनेक प्रकारचे रंग लावून रंगवले. त्यानंतर त्यांची सकाळी पूजा करण्यात आली.
जावलीसह सातारा जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात बेंदूर हा सण साजरा करण्यात आला. आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमे दरम्यान बेंदूर साजरा केला जातो. शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. ‘बेंदूर’ हा सण प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो. शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.