पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता मिळणार नाही

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अशीही अट आहे. नोंदणीसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या रेशनकार्डचे डिटेल्स अपलोड करावे लागतील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

तुम्ही अशाप्रकारे नोंदणी करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.