हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।अनेक वेळा असे म्हंटल जाते कि दारू पिणे किंवा कोणत्याही अमली पदार्थाची नशा करणे हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. नशा केल्याने अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल ची पिढी आपले दुःख आणि त्रास हा कमी करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी फायदेमंद आहे म्हणून बिअर चा वापर पेय म्हणून करतात. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे वेटलॉसच्या मिशनवर असणार्या अनेकांना नेमकी किती प्रमाणात बिअर घ्यावी हेदेखील जाणून घ्या. परंतु बिअर पिणे हे आरोग्यासाठी सुद्धा हितवाहक आहे असे म्हंटले आहे.
— जर तुम्हाला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर रेग्युलर बिअरऐवजी लो कॅलरी बिअरची निवड करा. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. बाजारात अनेक लो कॅलरी बिअरचे पर्याय उपलब्ध आहेत.
— बिअर प्यायल्याने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. परिणामी अर्थ्राईटीसचा त्रास वाढण्यास प्रतिबंध होते.
— बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात.
— बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.
— बिअर पिल्याने माणूस हा आनंदी राहू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’