हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सुंदर दिसावे असं सर्वानाच वाटतं. सुंदर दिसण्यासाठी अनके जण कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करतात. यामध्ये चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आम्ही तुम्हाला चंदनाच्या अशा गुणधर्माबद्दल सांगणार आहोत जे पाहतच तुम्हालाही चंदन लावण्याचा मोह आवरणार नाही.
त्वचा उजळते-
चंदनामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेला चमक येऊन तुमचा रंग उजळतो तसेच केसांचे आरोग्यही राखते. त्वचेवरील डाग दूर करण्यासही चंदन उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्हाला एक चांगला आणि फ्रेश लूक मिळतो.
डोकेदुखीवर मात-
तुम्हाला माहित नसेल तर चंदन लेप डोकेदुखीवर रामबाण उपाय आहे. कपाळावर चंदन लावल्याने माथा थंड राहतो. आणि डोकेदुखी पासून आराम मिळतो.
ताप आल्यास चंदन उपयुक्त-
वास्तविक, चंदनाचा प्रभाव थंड असतो. ताप आल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावल्यास अंगामधील उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ताप लवकर उतरू शकतो.
झोप लागते –
निद्रानाशाच्या समस्येवर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे झोप लागण्यास मदत होते.
एकाग्रता सुधारते-
चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.