हिवाळ्यात संत्री म्हणजे आरोग्यासाठी संजीवनी; होतात 5 मोठे फायदे

benefits of orange
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असल्यामुळे सर्वांनाच आवडतात. पण तुम्हांला माहित आहे का, संत्री हे आरोग्यदायी सुद्धा असून त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदाच होतो. त्यातच सध्या हिवाळा असून सगळीकडे कडाक्याची थंडी असते. यामुळे सर्दी, ताप यापासून आपलं रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. सर्दीपासून संरक्षण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी संत्री रामबाण उपाय आहे. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे…

पचनशक्ती मजबूत होते-

संत्री मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते. हिवाळ्यात रोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला मोठा फायदा होतो. संत्र्यामध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे खूप वेळपर्यंत भूक लागत नाही आणि आपलं वजनही आटोक्यात राहते.

त्वचा चमकदार होण्यास मदत-

संत्री खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार तर बनतेच त्याचबरोबर त्याच्या मदतीने तुमच्या त्वचेवरील डाग देखील कमी होऊ शकतात. त्याचाच भाग म्हणजे अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये संत्र्याचा वापर केला जातो. दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचेवर चांगली चमक येते.

डोळ्यांसाठी फायदेशीर-

संत्र्याचे सेवन हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हांला डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची सवय लावून घ्या. कारण संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ए यामध्ये चांगल्या प्रमाणात आढळते जे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास संत्री उपयुक्त ठरतात.

किडनी स्टोनवरही फायदेशीर –

संत्र्याचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. संत्र्याचा रस किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. संत्र्यामध्ये अस्तित्वात असलेले व्हिटॅमिन-सी किडनी स्टोन विरघळण्याचे काम करते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या असल्यास संत्री नक्की खावावी.

पोटाच्या समस्या दूर ठेवते-

नियमित संत्री खाल्ल्याने गॅस, अपचन, इफेक्शन, बद्धकोष्ठता, सूज, यांसारख्या समस्या दूर करता येतात. तसेच संत्र्याचा रस गरम करून त्यात काळे मीठ, डाळिंबचा रस एकत्र करून प्यायल्याने पोटदुखीचा त्रासही कमी होतो.