हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सकाळी सकाळी लवकर उठून नाश्ता करणे हि बहुतेक जणांची सवय असते. नित्यनियमाने ज्या पद्धतीने व्यायाम करणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने दररोज नाश्ता करणे शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या थंड पाणी न पिता गरम पाणी पिणे हे शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाश्ता करतांना सुद्धा पोटभरून नाश्ता ना करता काही प्रमाणात नाश्ता करणे सोयीस्कर असते. नाश्ता करतांना पचनास अवघड जाईल अश्या पदार्थांचा समावेश ना केलेला बरा. नाश्ता करताना जास्त प्रमाणात पोहे या पदार्थांचा वापर केला जातो. त्याचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया. Benefits Of Eating Poha For Breakfast
पोहे खाण्याचे गुणकारी फायदे –
— पोह्यांमध्ये कॅलरीजची मात्रा कमी असते. त्यामुळे पोहे खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी पोह्याचं सेवन करणं फायदेशीर आहे.
— मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा अत्यंत पोषक नाश्त्याचा पर्याय आहे. कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर हळूहळू कमी होते. .तसेच पोटभर पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
— पोह्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. तसंच रक्तप्रवाह नियंत्रणात होतो.
–.गरोदर महिला आणि लहान मुलांनी पोहे जरुर खावेत. यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
— पोहे नाश्त्यात खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते. शरीराला एनर्जी सुद्धा मिळते.
— या पदार्थांमध्ये कार्बोहायड्राइट्स चे प्रमाण जास्त असते. सकाळच्या नाश्त्यामधून कार्बोहायड्रेट मिळवण्यासाठी पोह्यांचे सेवन फायदेशीर ठरते. जर शरीराला पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळाले नाहीत तर दिवसभर थकवा जाणवतो. आणि कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही.
— अनेक वेळा पोह्यांमधे वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. पोह्यांमध्ये भाज्या घातल्याने त्यातील व्हिटामिन,मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते. आवडीनुसार त्यात मोड आलेली कडधान्य, सोयाबीन,शेंगदाणे किंवा उकडलेले अंड मिसळल्याने त्यात प्रोटीन्सची मात्रा वाढते.
–जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांनी सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खाणे चांगले. त्यामुळे पोहे हा झटपट बनणारा आणि आरेग्याला उपयोगी ठरणारा नास्ता मानला जातो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’