हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tomato ही जेवणात नेहमी वापरली जाणारी फळभाजी आहे. मग ते वरणात चव येण्यासाठी असो किंवा त्याची चटणी असो. Tomato हा रोजच्या आहारातील साथीदार मानला जातो. तुम्हीही रोज टोमॅटो खात असाल तर तुम्हाला टोमॅटो खाण्याचे फायदे माहित आहेत का? नसेल माहिती तर जाणून घेऊयात.
काय आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे?
१) त्वचेसाठी असते फायदेशीर
अनेकजण आपल्या त्वचेला घेऊन काळजीत असतात. त्यामुळे अश्यानी जर टोमॅटो खाल्ला तर तो तुमच्याशी स्किनसाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला टोमॅटो खायला आवडत नसेल तर तो तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आणि ग्लोईंग स्किन मिळवू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, उन्हामुळे झालेली टॅनींग निघून जाते. आणि तुमची स्किन पूर्णपणे चांगली होते. त्यासाठी टोमॅटोचे सेवन करा.
२) मधुमेहावर नियंत्रण ठेवता येत
मधूमेहाची तक्रार अनेकजण करतात. त्यासाठी विविध पर्याय देखील वापरतात. मात्र अनेकांना त्याचा फायदा होत नाही यासाठी तुम्ही टोमॅटो खाऊन मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता. टोमॅटोमध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असे अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुम्ही टोमॅटोचे सूप करून देखील पिऊ शकता. ते तुमच्याशी अधिक फायद्याचे राहील.
३) कॅन्सरचा धोका होतो कमी
टोमॅटोमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे एक कैरोटीनॉयड आहे. टोमॅटो कॅन्सरविरोधात किमो प्रिव्हेंटिव्ह प्रमाणे काम करतो. त्यामुळे टोमॅटोचे सेवन केल्यास तुम्हाला होणाऱ्या कॅन्सरचा धोका टाळला जातो. आणि तुम्ही निरोगी राहता.
४) वजन कमी होण्यास मदत
वजन ही आजकालच्या लोकांचा कॉमन प्रश्न झाला आहे. अनेकजन त्यामुळे टेंशन मध्येही असतात. त्यामुळे अश्या लोकांनी जर टोमॅटो खाल्ला तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होत नाही. तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे तुमची पचन शक्ती मजबूत होते. त्यामुळे टोमॅटो हा अत्यंत फायदेशीर असे फ्रुट आहे. ते तुम्ही रोज खाऊ शकता.