Mahila Samman Savings Certificate म्हणजे काय ??? यामध्ये कोणकोणते फायदे मिळतील ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी ‘Mahila Samman Savings Certificate’ ही नवीन बचत योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक वन-टाइम सेव्हिंग स्‍कीम आहे. हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारकडून मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) नावाची योजना चालवली जाते आहे. तर SSY ही लॉन्‍ग टर्म इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. मात्र आता या दोन योजनांमध्ये नक्की फरक काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग या योजने माहिती जाणून घेउयात…

Budget 2023: Mahila Samman Saving Certificate - New small savings scheme  for women

Mahila Samman Savings Certificate (MSSC) मध्ये फक्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. त्याचा मॅच्युरिटी कालावधी दोन वर्षे आहे. तसेच या योजनेमध्ये दरवर्षी 7.5 टक्के व्याज दिले जाणार आहे. यामध्ये कोणतीही महिला अथवा मुलीला गुंतवणूक करता येईल. यामध्ये एकरकमी पैसे गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे या योजनेमधून अंशतः पैसे काढण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.

याबरोबरच सरकारच्या इतर योजनांप्रमाणेच यामधील गुंतवणुकीवर कलम 80C द्वारे इन्कम टॅक्स सवलत देखील मिळेल. तसेच लहान बचत योजनांपेक्षा महिला सन्मान योजनेमध्ये जास्त व्याज मिळेल. यावर मिळणारे व्याज टॅक्स फ्री असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sukanya Yojana : एसबीआई में ऐसे खोलें अपनी बच्ची के लिए सुकन्या समृद्धि  योजना व पीपीएफ के खाते - Sukanya Yojana : Open Sukanya Samriddhi Yojana  account for your girl child and

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कमीतकमी 250 रुपयांमध्ये खाते उघडता येते. यामध्ये वार्षिकरित्या 1.50 लाख रुपये जमा करता येतील. यावर सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. हे जाणून घ्या कि, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या पालकांना हे खाते उघडता येईल. ही योजना 21 वर्षामध्ये मॅच्युर होते. विशेष म्हणजे खाते उघडल्यानंतर फक्त 15 वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतात.

तसेच या योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांवर इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. याशिवाय या योजनेच्या मुदतपूर्तीवर मिळणारे व्याजही टॅक्स फ्री आहे. मुलीच्या वयाच्या 18 वर्षांनंतर तिला या खात्यातून पैसे काढता येतील. तसेच वयाच्या 21 व्या वर्षी ती खात्यात जमा झालेले सर्व पैसे काढू शकते.

Save Rs 1 daily, get benefit of Rs 15 lakh on maturity; Know where to  invest- | Business News – India TV

दोघांमधील फरक जाणून घ्या

सुकन्या समृद्धी योजना आणि Mahila Samman Savings Certificate (MSSC) योजनेतील मुख्य फरक म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी आणि व्याज. ज्या महिलेला अल्प कालावधीसाठी पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योग्य ठरेल कारण त्याचा मॅच्युरिटी कालावधी फक्त दोन वर्षांचा आहे. तर, SSY 15 वर्षांत मॅच्युर होते. SSY मध्ये 7.6 टक्के तर MSSC मध्ये 7.5 टक्के व्याज मिळेल.

SSY योजनेत मिळणारे व्याज टॅक्स फ्री आहे तर MSSC वर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स आकारला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ज्यांना दीर्घ मुदतीसाठी जास्त पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी SSY योग्य ठरेल. कारण यामध्ये 15 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. मात्र, Mahila Samman Savings Certificate मध्ये गुंतवणुकीची मर्यादा फक्त दोन लाख रुपये आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89

हे पण वाचा :
व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा
Motorola Moto E13 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा जबरदस्त फोन भारतीय बाजारपेठेत दाखल, असे असतील फीचर्स
New Business Idea : दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत