हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Platform Ticket : देशात मोठ्या संख्येने लोकं रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे प्रशासन देखील प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविते. स्वस्त आणि सुलभ प्रवासामुळे बहुतेक लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यास पसंती देतात. भारतीय रेल्वे देखील प्रवाशांना तणावमुक्त प्रवासासाठी अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. जर आपल्याला ट्रेनमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला प्रवास करता येणार नाही. मात्र जर आपल्याला तिकीट मिळाले नसेल आणि प्रवास करण्याचा असेल तर यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट खूपच उपयुक्त ठरेल.
हे लक्षात घ्या कि, रेल्वेच्या नियमांनुसार जर आपण केले तिकीटाचे आरक्षण नसेल आणि आपल्याला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर Platform Ticket घेऊन ट्रेनमध्ये चढता येईल. यानंतर TTE ला भेटून तिकीट मिळवता येईल.
प्लॅटफॉर्म तिकिटाद्वारे प्रवास करण्याच्या अटी
रेल्वेच्या या नियमानुसार, प्रवाश्याला प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर लगेचच TTE शी संपर्क साधावा लागेल. ज्यानंतर TTE आपल्याला डेस्टिनेशन पॉइंटपर्यंत तिकीट देईल. हे लक्षात घ्या कि, Platform Ticket द्वारे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा आणि प्रवास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, यासाठी प्रवाशाला ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे तिथपासूनचे भाडे भरावे लागणार आहे. तसेच भाडे आकारताना तो ज्या क्लासच्या डब्यामध्ये चढला असेल त्या क्लासचेच भाडे द्यावे लागेल.
तिकीट सोबत ठेवावे लागणार
हे लक्षात घ्या कि, प्रवास करताना रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेले तिकीट सोबत ठेवणे आवश्यक आहे. मात्र जर तिकिटाचा फोटो काढून प्रवास करणार असला तर तसे करता येणार नाही. तसेच जर प्रवाश्याकडे काउंटर वरून खरेदी तिकीट जवळ नसेल तर काही अटी पूर्ण करून प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी मिळू शकेल. त्यासाठी सदर व्यक्तीला ज्या नावाने तिकीट काढले आहे तो आपणच असल्याचे TTE समोर हे सिद्ध करावे लागेल. यानंतर तिकिटाच्या पैशांबरोबर काही दंड भरून तिकीट दिले जाईल. Platform Ticket
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctchelp.in/platform-tickets-indian-railway/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा