हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। गुलाब हा सगळ्यांच आवडत असतो . त्याचा सुगंध हा इतर फुलांपेक्षा अधिक सुवासिक असतो. गुलाबाची मोहकता, सुगंध नेहमीच आपला मूड फ्रेश करण्यास मदत करतो. पण बुकेमध्ये किंवा गजरा आणि हारांपुरताच फुलांचा वापर होतो असे नाही. गुलाब हे फूल जितके सुगंधित दिसते तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत.
सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील गुलाब फायदेशीर ठरतो.त्यामधील मॉईश्चराईझिंग घटक, टोनिंग करण्याची क्षमता त्वचेमधील दाह कमी करून त्वचेला सतेज बनवते. आपला चेहरा मुलायम आणि तजेला ठेवण्याचे काम हे गुलाबपाणी करत असते. अनेक त्वचेशी निगडित प्रॉडक्ट मध्ये गुलाबपाणी याचा वापर केला जातो.
गुलाब हा फक्त त्वचेसाठी वापरला जात नाही . त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गुलाबाचे आरोग्यदायी गुणधर्म, सौंदर्य खुलवण्याची क्षमता यासोबतीने केसांचीही चमक वाढवण्यासाठी फायदा होतो. तुमचे केस लांब आणि काळे होण्या साठी सुद्धा गुलाबाच्या तेलाचा वापर केला जातो. म्हणूनच केसांचे आरोग्य जपण्यासाठी ब्युटी एक्सपर्ट अमित सरदा हे सांगतात की, नेहमी सकाळी आणि झोपण्यापूर्वी गुलाबपाणी लावावे.
कसे होतात फायदे—-
गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळून लावल्यास त्वचेला हायड्रेट करतात पण त्यासोबतच त्वचेला सतेज करण्यास, आणि चमक देण्यास गुलाबपाणी महत्त्वाची भूमिका बजावत. गुलाबपाणी चेहरा मॉईश्चराईज्ड करण्यास मदत करतात. मात्र गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळून केसांना लावल्यास टाळूवरील अतिरिक्त तेल प्रमाणात राहण्यास मदत होते. सोबतच टाळूवरील केस कमी प्रमाणात गळण्यास मदत होते. यासोबतच व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक यांचा मुबलक साठा असतो.त्यामुळे शाम्पूसोबत त्याचा वापर केल्यास टाळूवरील त्वचा मॉईश्चराईज्ड होण्यास मदत होते तसेच केस गळण्याचे प्रमाण हे पूर्ण कमी होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’