Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । vehicle scrappage policy : केंद्र सरकारकडून नुकतेचस्क्रॅपिंग पॉलिसी सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्ग्रत अनेक सवलती दिल्या जात आहेत. स्क्रॅपिंग म्हणजे जर एखाद्याकडे 15 वर्षांपेक्षा जुनी कार असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. ज्यानंतर अशा गाडयांना रस्त्यावर उतरता येणार नाही. मात्र जर असे करताना कोणाला पकडले गेले तर त्याला दंड देखील होऊ शकेल. या पॉलिसीमुळे आता आपल्या जुन्या गाडीचे काय होणार, अशी भीती अनेकांना सतावते आहे.

India's vehicle scrappage policy is here, but what next?

हे लक्षात घ्या कि अनेक लोकांना याबाबत माहिती देखील नाही. तसेच या vehicle scrappage policy मुळे आपल्याला काय फायदा होईल आणि जुन्या कारसाठी किती पैसे मिळतील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग या स्क्रॅपिंग पॉलिसीचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया…

vehicle scrappage policy चे फायदे काय आहेत ???

हे ल्सखात घ्या कि, जुनी वाहने नवीन वाहनांपेक्षा 10-12 पट जास्त प्रदूषण करतात. यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या प्रदूषणापासून काहीसा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जुन्या कारच्या तुलनेत नवीन वाहनांची इंधन कार्यक्षमताही चांगली आहे. त्यामुळे इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल.

Vehicle Scrappage Policy: What It Means For Existing Car Owners

वाहनांसाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार

या vehicle scrappage policy पॉलिसी अंतर्गत 10 वर्षे जुनी व्यावसायिक वाहने आणि 15 वर्षे जुन्या खासगी प्रवासी वाहनांना फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. सरकारकडून हे फिटनेस टेस्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. जर आपले वाहन फिटनेस टेस्ट मध्ये फेल झाले तर ते देशभरातील रजिस्टर्ड 60-70 स्क्रॅप फॅसिलिटीमध्ये जमा करावे लागेल.

Vehicle Scrappage Policy 2021: Expectations And Challenges | IBEF

जुन्या कारच्या बदल्यात काय मिळणार ???

जर एखाद्याची गाडी 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर त्या व्यक्तीला जुन्या गाडीच्या बदल्यात डिपॉझिट सर्टिफिकेट दिले जाईल. याद्वारे आपल्याला नवीन कार खरेदी करताना अनेक फायदे मिळतील. तसेच जुन्या गाडीच्या स्क्रॅपिंगसाठी जी किंमत मिळेल जे नवीन गाडीच्या शोरूम किंमतीच्या 5 टक्के असेल.

याशिवाय नवीन वाहन खरेदी करताना रजिस्ट्रेशन फी देखील द्यावी लागणार नाही. त्याच वेळी, राज्य सरकारकडून देखील ग्राहकांना खाजगी गाड्यांसाठी 25% आणि व्यावसायिक गाड्यांसाठी 15% पर्यंत रोड टॅक्स मध्ये सूट मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://morth.nic.in/Circulars-Notifications-related-to-Vehicle-Scrapping-Policy

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ बचत योजनेमध्ये मिळतोय 7 टक्क्यांहून जास्त रिटर्न

FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज

गेल्या 23 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 34,930% रिटर्न

Hawkins Cookers Ltd कडून आज लॉन्च केली जाणार FD, किती व्याज मिळेल ते तपासा

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा