Bank FD : ‘या’ 5 स्पेशल FD वर मिळते आहे जबरदस्त व्याज, फक्त ‘या’ तारखेपर्यंतच संधी उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांकडूनही व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. यावेळी बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. ज्यामुळे एकीकडे बँकांकडून कर्ज घेणे महागले असून दुसरीकडे FD वर जास्तीत जास्त व्याज देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अशातच काही बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास एफडी योजनाही चासुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत ग्राहकांना नियमित एफडीऐवजी जास्त व्याज दिले जात आहे.

ICICI Bank, Yes Bank revise their Fixed Deposit (FD) rates: Check new rates here - BusinessToday

हे जाणून घ्या कि, एचडीएफसी आणि एसबीआयसहीत अनेक बँकांद्वारे चालवल्या जाणार्‍या काही स्पेशल एफडींमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही. अनेक बँका या महिने किंवा वर्षांच्या ऐवजी दिवसांच्या आधारावर FD ऑफर करत आहेत. यामध्ये फक्त 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. Bank FD

तसेच 19 डिसेंबर 2022 रोजी इंडियन बँकेकडून ‘Ind Shakti 555 Days’ नावाने एक स्पेशल रिटेल FD लाँच करण्यात आली. यामध्ये 555 दिवसांसाठी 5000 रुपयांपासून 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक करता येईल. 31 मार्च 2023 पर्यंत ही योजना व्हॅलिड असेल. या अंतर्गत ही बँक सर्वसामान्य नागरीकांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दराने व्याज देत आहे. Bank FD

Earn Up To 8.1% Interest Rate On This Non-Bank FD; Check Details About NBFC  Bajaj Finance's FD

2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी HDFC बँकेकडूनही ‘सिनियर सिटीझन केअर FD’ लाँच करण्यात आली. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के वार्षिक दराने व्याज दिले जात आहे. 5 वर्षे आणि 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ही FD उपलब्ध आहे. Bank FD

आयडीबीआय बँकेच्या नमन सिनियर सिटीझन डिपॉझिटमध्ये एक वर्ष ते दहा वर्षांपर्यंत पैसे गुंतवता येतात. यामध्येही 31 मार्च 2023 पर्यंतच गुंतवणूक करता येईल. या बँकेकडून 1 वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.50 टक्के तर 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.25 टक्के व्याजदर दिला जातो आहे. Bank FD

These 4 FD Schemes Will End in 2023! Check Details Here

15 फेब्रुवारी 2023 रोजी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ‘अमृत कलश’ नावाने 400 दिवसांची FD लाँच केली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के तर सर्वसामान्यांना 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामध्ये 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

त्याच प्रमाणे SBI WeCare FD हा एक स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट कार्यक्रम देखील आहे. जो फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच उपलब्ध असेल. 31 मार्च 2023 रोजी, अनेक दिवसांच्या विस्तारांनंतर तो देखील बंद केला जाणार. यामध्ये कमीत कमी पाच वर्षे तर जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के दराने व्याज दिले जाते. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbi.co.in/documents/136/1364568/230920-SBI+WE+Care.pdf/cde6faa8-01fe-aeed-35ab-bd8f1a39fd82?t=1600845678718?ref=inbound_article

हे पण वाचा :
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
Gold Price Today : उच्च पातळीवरील नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर
7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !!! 18 महिन्यांचा DA मिळणार नाही