हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सुट्टयामध्ये फिरायला जाण्यासाठी अनेक चर्चा होतात. वेगवगेळी ठिकाणेही सुचवली जातात. मात्र शेवटी गाडी येऊन थांबते ती गोवा बीचवर. गोवा आणि तेथील बीच म्हणजे सर्व सुखाच्या सोबतीसारखे वाटते. गोव्याचा समुद्र, विविध संस्कृतीने नटलेला तिथला परिसर आणि ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेलं गोवा, प्रत्येकाला स्वतःकडे खेचते. आणि त्यामुळेच आयुष्यात एकदा तरी गोव्याला जावं असं प्रत्येकाला वाटत. परंतु एकदा गोव्याला गेल्यावर तिथले नैसर्गिक सौंदर्य पाहून नेमक्या कोणकोणत्या बीचला भेट द्यायची यामध्ये मात्र काहीजण गोंधळलेले असतात. पण आता जास्त विचार करू नका, आज आम्ही गोव्यातील अशा ४ बीच बाबत (Best Beaches In Goa) सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही नक्कीच गेलं पाहिजे आणि मनसोक्त आनंद घेतला पाहिजे.
1) बागा बीच-Baga Beach
गोव्यातील सर्वात प्रसिद्ध यादीत गणले जाणारे बीच म्हणजे बागा बीच होय. येथे असणारे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या डोळ्याचे पारणे फेडते. बागा बिचच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे वॉटरस्पोर्ट्स. त्यामुळे पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. येथे तुम्हाला मैदानी खेळ खेळण्यास देखील भरपूर जागा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसोबत, मित्रांसोबत येथे दिवस घालवू शकता. त्याचप्रमाणे पब प्रेमिंना बार आणि क्लबची देखील सुविधा प्राप्त आहे. तसेच उत्तम जेवण देखील तुम्हाला येथे मिळते.
कसे जावे –
बागा बीच हे पणजीपासून १७ किमी अंतरावर आहे.त्यामुळे पणजी ते बागा बीचपर्यंत तुम्हाला टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा आरामात मिळेल.
2) कँडोलिम बीच- Candolim Beach
गोव्यातील सर्वात लांब किनार्यांपैकी एक म्हणजे कँडोलिम बीच. ह्या बीचला (Best Beaches In Goa) राज्यातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांचे प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. फोर्ट अगुआडापासून सुरू होणारा समुद्रकिनारा तुलनेने शांत आहे. ह्या बिचची विशेष बाब म्हणजे येथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही उत्स्फूर्तपणे समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटते. येथे वॉटरस्पोर्ट्स प्रेमींसाठी, पॅरासेलिंग आणि वॉटर स्कीइंग सारख्या काही क्रियाकलाप आहेत.
कसे पोचाल –
कांडोलिम बीचपासून 11 किलोमीटर अंतरावर पणजीचे बस स्टँड आहे. त्यामुळे सर्वप्रथम पणजी बस स्टँडवर तुम्हाला यावे लागेल. इथून तुम्ही लोकल कोणत्याही गाडीने किंवा टॉक्सिन कँडोलिम बीचवर पोहोचाल.
3) कळंगुट बीच- (Calangute Beach) Best Beaches In Goa
कळंगुट शहरातील कळंगुट बीच हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आणि उत्तर गोव्यातील सर्वात मोठा समुद्रकिनारा म्हणून गणला जातो. येथे असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती ही एक वेगळीच अनुभूती देते. त्यामुळे येथे भेट देणारे लाखो हजारो लोक आहेत. तसेच परदेशी पाहुणे तुम्हाला ह्या बीचवर अधिक पाहायला मिळतील. गोव्याची राजधानी पणजीपासून अवघ्या 15 किमी अंतरावर हा समुद्रकिनारा वसलेला आहे. पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग, बनाना राईड आणि जेट स्कीइंग हे येथील प्रसिद्धीस पावलेले खेळ म्हणता येतील .
कसे जावे –
कळंगुट बीच हा सुद्धा पणजीपासून १६ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पणजी ते कळंगुट बीचपर्यंत तुम्हाला खासगी ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सी सहज उपलब्ध होईल .
4) वॅगेटोर बीच- Vagator Beach
वॅगेटोर बीचवर काळे खडक असल्याकारणाने ती येथील लोकप्रिय बाब मानली जाते. या बीचला गोव्यातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून मानांकन देण्यात आले आहे. वॅगेटर बीच हे समुद्रकिनारी असलेल्या हेडलँडद्वारे तीन मुख्य समुद्रकिनाऱ्यांमध्ये विभागले गेले आहे. कार पार्क आणि ट्रिंकेट्स, कपडे, शीतपेये आणि स्नॅक्स विकणारे असंख्य स्टॉल येथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे खाण्यापिण्याची चिंता सोडून ह्या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.
कसे जावे –
वॅगेटोर बीच सुद्धा पणजीपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही टॅक्सी आणि खाजगी वाहनांद्वारे येथे आरामात आणि कमी वेळेतच पोहचाल.