शहिद भगतसिंग आजच्या संदर्भात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भगतसिंग जयंतिविशेष | मोनाली अवसरमल

Centre for the study of development societies (CSDS) च्या २०१७ च्या सर्वेक्षणा नुसार भारतीय तरुणांची वैचारीक दृष्टी पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही विचारधारेचं समिश्रण आहे, असं पहाण्यात आलं आहे. मागे शशी थरुर ही एकदा म्हणाले होते की, ‘भारतीय तरुण हा कट्टर प्रतिगामी किंवा सनातनी नाही. तो फक्त Confused आहे.

ह्या अशा समिश्र, confused अवस्थेसाठी भगतसिह चे एक वाक्य आठवतं, “आपल्या पारंपारिक वारशाचे दोन भाग असतात, एक सांस्कृतिक आणि दुसरा मिथीहासिक. निरपेक्ष देशसेवा, बलिदान, आपल्या निष्ठांवर अढळ राहणे, अशा आपल्या सांस्कृतिक गुणांना पुर्ण प्रामाणिक पणे आत्मसात करुण पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. पण जुन्या काळातील समजेनुसार बनलेले जे मिथिहासिक विचार आहेत ते जसेच्या तसे स्विकाराण्याला मी अजिबात तयार नाही. कारण विज्ञानाने ज्ञानामधे प्रचंड भर टाकली आहे आणि वैज्ञानिक दृष्टी आत्मसात करुनच भविष्यातील समस्या सोडवता येतील.”

इतर महत्वाचे –

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

भगतसिंगांनी फाशीवर जाण्यापूर्वी ही गोष्ट केली

भगत सिंह चे विचार आज कधी नसेल इतक्या तीव्रतेने तरुणां पुढे जाणे म्हणुन महत्वाचे आहे. जिथे वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांद्वारा आम्हा तरुणांना influence किंवा brain wash केलं जात आहे, तिथे भगत सिंह म्हणतो, “टिकात्मक दृष्टी आणि स्वतंत्र विचार करणे हे दोन असे अत्यावश्यक गुण आहे” (मी नास्तिक का आहे, १९३०)

“युवावस्था मानवी जीवनाचा वसंत काळ आहे”, असं भगत सिंह ‘युवक’ नामक त्याच्या एका लेखात म्हणत असताना आम्हा तरुणांना आठवण करुण देतो की तरुणां मधे किती ताकद आहे, उर्जा आहे. जेव्हा तो आम्हाला “महासागराच्या उन्मत, उत्तुंग लाटेची उपमा देतो तेव्हा मनात एक वेगळीच स्फुर्ती निर्मान होते.

इतर महत्वाचे –

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती विशेष

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

ह्या अशा शहीद भगत सिंहा विषयी आणखी काय लिहिणार. जन्म होऊन १११ वर्ष लोटली असताना सुद्धा त्याचा एक एक शब्द जणू काही आमच्यासाठी, ह्या परिस्थितीसाठीच लिहीला आहे की काय असं वाटतं. २३ वर्षांचं जेमतेम आयुष्य त्यात फक्त साडे आठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असलेलं त्याचं वाचन, लिखाण व वैचारिक प्रगल्भता हे विस्मयकारक तर आहेच पण प्रेरणादायी ही आहे.

साहित्य, तत्वज्ञान व भाषा या सर्व विषयांचा त्याचा अभ्यास होता. मार्क्स, एंगल्स, प्लेटो, रुसो, ट्राॅटस्की अशा अनेक विचारांचा त्याने अभ्यास केला. याची प्रचिती भगत सिंहा ने लिहीलेल्या प्रत्तेक लेखातून वा पुस्तकातून होते. आणि हळूच मग कानाशी एक हाक येते, “अभ्यास कर..चर्चेला तोंड देणे शक्य व्हावे म्हणुन अभ्यास कर. तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून अभ्यास कर.” (मी नास्तिक का आहे, १९३०)

मोनाली अवसरमल

(लेखिका समाजविज्ञान अकादमी, पुणे येथे समन्वयक आहेत)

 

Leave a Comment