समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले आहे. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे”, असं कोश्यारी म्हणाले. मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं असे कोशारी यांनी म्हंटल

ते पुढे म्हणाले, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.