आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे. विशालच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. आपल्याला आईची आठवण येत असल्याचे त्याने या सुसाईड (Sucide) नोटमध्ये लिहिले आहे.

काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील एन्झोकेम हायस्कूल समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड या तरुणाने आपल्या आईच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत विशालने हे टोकाचे पाऊल उचलण्यागोदर एक चिठ्ठीसुद्धा लिहिली होती. एका छोट्या कागदावर लिहिलेली ही नोट पोलिसांना त्याच्या खिशात सापडली आहे.

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये ?
काही महिन्यांपूर्वीच मयत झालेल्या आईची खूप आठवण येत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी त्याने लिहिली होती. आपल्या आईच्या विरहातून विशालने आत्महत्या (Sucide) केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून येवला शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!

Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ

‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये !!!

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ???

Leave a Comment