दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यामधील घटना

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचासह अन्य विविध कलमान्वये व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या नराधमाचे नाव मधुकर हरी रंगारी असे आहे.

या घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली शिलाईला दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. या वेळी आरोपी मधुकर रंगारी याने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून नेऊन दार बंद केले. यावेळी दोन्ही मुलींनी आरडाओरड केली असता आरोपीने त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण केली. तसेच त्याने दोन्ही मुलींवर अत्याचार केला. मुलींच्या ओरडण्याचे आवाज येतात घराशेजारील लोकांनी खिडकीतून डोकावून पहिले असता मधुकर हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असल्याच्या स्थितीत आढळून आला.

या घटनेची माहिती पीडित मुलींच्या पालकांना समजताच त्यांनी तातडीने लाखांदूर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्हा दखल केला. दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींचे आरोग्य तपासणी अहवालावरून लाखांदूर पोलिसांनी मधुकर रंगारी विरोधात विविध कलमांसह पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करत आहेत.