काॅंग्रेसचा नेता म्हणतो : कोण आशिष देशमुख…काय त्याची व्हॅल्यु?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
आशिष देशमुखांच काय लोकल आहे, बीजेपीमधून आलेला माणूस आहे. आमदार भाजपाचा राहिलेला, त्याच नागपूरमध्ये काय लोकल आहे. अशा किरकोळ माणसाने स्टेटमेंट दिल तर काही कमेंट देण्याची गरज नाही. कोण आशिष देशमुख, काय त्याची व्हॅल्यु आहे, काॅंग्रेस पक्षामध्ये त्याचं काय योगदान आहे असा सवाल काॅंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी उपस्थित केला आहे. कराड येथे ते हॅलो महाराष्ट्रशी बोलत होते.

भानुदास माळी म्हणाले, काही कारण नसताना नाना पटोले यांच्या बद्दल बेजबाबदारपणेची वक्तव्ये करित आहेत. बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकीचा प्रचारात काही योगदान नाही. परंतु निवडूण आलेल्या महाविकास आघाडीच्या नव्हे तर एका अपक्षांचे अभिनंदन केले. त्यांनी स्पष्ट दाखवून दिलं आहे, की काॅंग्रेसशी त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या पदाला धक्का लागला तर सर्व समाज पेटून उठेल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2976184559345065

बाळासाहेब थोरात यांची पक्षविरोधी भुमिका
नाशिक पदवीधर निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी मित्र पक्षातील काहींनी सत्यजित तांबे यांचे काम केले. त्यामुळे अपक्ष श्री. तांबे विजयी झाले. बाळासाहेब थोरात यांनी आपली सर्व यंत्रणा पक्षाच्या विरोधात लावली होती. काॅंग्रेसच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा घेतलेली आहे, असाही आरोप भानुदास माळी यांनी केला आहे.