Bharat Rice Yojana: खुशखबर! आजपासून ग्राहकांना 29 रूपये किलो दराने तांदूळ मिळणार

Rice Low Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळेच या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार (Central Government) आजपासून देशात “भारत राईस योजना” (Bharat Rice Yojana) लागू करणार आहे. या योजनेमुळे तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. हा अनुदानित तांदूळ पाच किलो आणि दहा किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल. ज्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल.

5 किलो ते 10 किलोचे पॅकिंग (Bharat Rice Yojana)

देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून भारत राईस योजना लागू केली आहे. आज केंद्रिय अन्न मंत्री पियुष गोयल दिल्लीतील कर्तव्यपथावर भारत राईस सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत 5 लाख तांदुळ विकला जाणार आहे. या तांदळाची विक्री पाच किलो ते दहा किलोच्या पॅकिंगमध्ये करण्यात येईल. याची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल.

दरम्यान, गेल्या एका वर्षांमध्ये तांदळाच्या किरकोळ किमतीत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच, तांदळाच्या किमती कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे. सध्या बाजारात NAFED आणि NCCF च्या माध्यमातून भारत आटा 27.50 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. तर डाळ 60 रुपये प्रति किलो दराने विकण्यात येत आहे. या सर्व किमती पाहता तांदळाचे दर यामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणूनच केंद्र सरकारने भारत राईस योजना (Bharat Rise Yojana) आणली आहे.