नवी दिल्ली I किराणा दुकान किंवा इतर दुकानदारांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित इतर गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवलाच्या समस्येचा सामना करावा लागतो. आता त्यांची ही समस्या Fintech प्लॅटफॉर्म BharatPe द्वारे सोडवली जाईल. BharatPe ने सोमवारी आपल्या मर्चेंट पार्टनर्ससाठी गोल्ड लोन लॉन्च करण्याची घोषणा केली. या अंतर्गत सोने तारण ठेवून 30 मिनिटांत 20 लाख रुपयांपर्यंतचे लोन घेता येते.
अलीकडच्या काळात वादात सापडलेल्या फिनटेक प्लॅटफॉर्मने 2022 च्या अखेरीस 500 कोटी रुपयांचे गोल्ड लोन वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही माहिती देताना BharatPe चे CEO सुहेल समीर म्हणाले,”BharatPe ने यासाठी काही नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांशी (NBFC’s) करार केला आहे. याशिवाय युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही आधीच तिची को-प्रमोटर आहे. यासह BharatPe ने सिक्योर्ड लोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.”
सध्या BharatPe ने दिल्ली-NCR, बेंगळुरू आणि हैदराबादमधील दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी गोल्ड लोन ऑफर केले आहे. या वर्षाच्या अखेरीस, कंपनी 20 शहरांमध्ये आपल्या मर्चेंट पार्टनर्सना गोल्ड लोन देऊ करेल. समीर सुहेल म्हणाले,”पायलट प्रोजेक्ट दरम्यान आम्ही 10 कोटी रुपयांचे गोल्ड लोन वितरित केले आहे. या वर्षाच्या अखेरीस 500 कोटी रुपयांचे गोल्ड लोन उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.”
30 मिनिटांत लोन मिळवा
BharatPe दरमहा 0.39 टक्के म्हणजेच वार्षिक 4.7 टक्के व्याजदराने गोल्ड लोन देईल. लोन अप्लिकेशन आणि डिसबर्समेंट प्रक्रिया 30 मिनिटांत डिजिटल पद्धतीने केली जाईल. व्यवसायिक सहा, नऊ आणि 12 महिन्यांच्या कालावधीसाठी लोन घेऊ शकतील आणि सुलभ दैनिक हप्त्यांमधून (EDI) कर्जाची परतफेड करू शकतील. BharatPe ने सांगितले की, ते लवकरच परतफेडीसाठी EMI (मासिक हप्ता) पर्याय देखील लॉन्च करेल.
फिनटेक प्लॅटफॉर्म ऑफलाइन व्यापारी आणि किराणा स्टोअर मालकांना 7 लाख रुपयांपर्यंत अनसिक्योर्ड लोन देत आहे. आतापर्यंत, BharatPe ने 3 लाख मर्चेंट पार्टनर्सना 3,000 कोटी रुपयांहून जास्तीचे लोन दिले आहे.