हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात जोरदार भाषण करत भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक करत परत येण्याची विनंती केली आहे. शिवसेनेविरोधात भाजपवाले तुमचा वापर करत आहेत. त्यांना तुमच्याबद्दल काहीही प्रेम नाही. शिवसेनेत आपापसात भांडण लावून शिवसेना संपवण्याचा यांचा डाव आहे असा आरोप भास्कर जाधव यांनी केली.
“एकनाथ शिंदेसाहेब, भाजपवाले तुमचा वापर शिवसेनेविरोधात करत आहे. तुम्हाला भाजपवाले लढवत आहेत, तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम आलेलं नाही. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई करण्याचा यांचा डाव आहे. रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल.शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव आहे, असा आरोप भास्कर जाधवांनी यावेळी केला.. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी शिंदे साहेब एक पाऊल मागे या,” असे जाधव म्हणाले.
यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक, संजय राठोड यांच्यावर तुम्ही ईडी लावली पण आज त्यांनाच तुम्हाला संरक्षण द्यावं लागत असा टोला भाजपला लगावला. भाजपने आजपर्यंत कितीतरी नेत्यांना आधी ईडी लावली आणि नंतर आपल्याच पक्षात घेऊन धून घेतल असं म्हणत भास्कर जाधव यांनी थेट चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील अशा ऐकून २० हुन अधिक आमदारांची नावेच जाहीर केली.