भास्कर जाधवांचे झंझावाती भाषण; सरनाईक, संजय राठोड वरून भाजपवर निशाणा

0
151
Bhaskar Jadhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी आज झंझावाती भाषण करत सभागृह दाणादुन करून सोडलं. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक आणि संजय राठोड यांचे थेट नाव घेत भाजपवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी सोबत सत्तास्थापन करताना तुमचं हिंदुत्त्व कुठे गेलं होत असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला,

पहिल्या दिवसापासून भाजपची कृती हे सरकार उलथून लावण्याची होती. सकाळी सरकार पडेल, १५ दिवसांनी पडेल, महिन्यांनी पडेल असं तुम्ही सांगत होता. तुम्ही कोणाच्या हातात भोंगा दिला, कोणाच्या हातात हनुमान चालीसा दिली. तुम्ही हिजाब महाराष्ट्रात आणला. कधी कंगना मध्ये आणली. पण सत्ता उलटली नाही असे म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला.

Maharashtra Vidhansabha Live : शिंदे, फडणवीस यांच्यावर मविआ नेत्यांची जोरदार टीका

संजय राठोड यांचे मंत्रिपद यांचे मंत्रिपद घालवण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले आता त्याच संजय राठोड यांचं तुम्ही काय करणार असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव याना ईडी चौकशी लावली पण आज त्यांनाच संरक्षण देण्याची वेळ तुमच्यावर आली असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मराठी माणसावर तुम्ही ईडी लावता. चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हार्दिक पटेल, प्रसाद लाड, राम कदम, प्रशांत परिचारिका, सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांच्यासहित अनेक जणांना याना तुम्ही कसे धुवून घेतले असं म्हणत त्यांनी भर सभागृहातच नेत्यांची नाव घेतली. यानंतर सभागृहात गदारोळ उडाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here