हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बहिण भावाच नातं आणखीन घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. आज याचं सणानिम्मित भाऊ आपल्या बहिणीच्या सासरी जातात. यानंतर बहिणी आपल्या भावाचे औक्षण करून त्याला ओवाळतात. त्यामुळे आजचा हा सण सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा असतो. खरे तर, भाऊबीज सणाचा थेट संबंध मृत्यूच्या देवता यमराजाशी जोडलेला आहे. म्हणूनच या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊबीज सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केला जातो. आज आपण या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त जाणून घेणार आहोत.
शुभ मुहूर्त
आज म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज सण आला आहे. आज तुम्ही आपल्या भावाचे औक्षण करणार असाल तर त्यासाठी दोन शुभ मुहूर्त चालून आले आहेत. यातील पहिला शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.44 ते 9.24 पर्यंतचा आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12 पर्यंत आहे. या काळात तुम्ही आपल्या भावाचे औक्षण करू शकता.
भाऊबीज सणाचे महत्त्व
आजच्या सणाला भत्री द्वितीया असे ही म्हणतात. भाऊबीज सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करतो. पौराणिक कथेनुसार, सूर्याची पत्नी छाया हिला यमराज आणि यमुना ही दोन मुले होती. यमुनेचे तिच्या भावावर खूप प्रेम होते. ती सारखी आपल्या भावाला तिच्या घरी जेवायला बोलवायची. परंतु यमराज जात नसतं. परंतु एकेदिवशी यमुनेने आपल्या भावाला वजनाच्या बंधनात अडकवून तिच्या घरी येण्यास भाग पाडले. तेव्हापासून ते आजवर भाऊबीज परंपरा चालू आहे.