हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने धाडी टाकल्यानंतर भावना गवळी यांनी भाजपवर आरोप केला आहे. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे असे भावना गवळी यांनी म्हंटल. तसेच मला कोणतीही नोटीस न देता थेट चौकशी सुरू करण्याचा जुलमी प्रकार करण्यात आला आहे असेही त्यांनी म्हंटल.
भावना गवळी म्हणाल्या, अनेक लोकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला.
एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच माझी काय चौकशी करायची ती जरुर करा, पण ही चौकशी करत असताना भाजपचे आमदार आहेत जे त्यांच्यावर 500 कोटी रुपयांचा आरोप आहे. त्यांचे कागदपत्रं ईडी ऑफिसमध्ये आले आहेत. त्यांचीही चौकशी करा. ही माझी केंद्र सरकारला विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.