इंदोर, मध्य प्रदेश | अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान डॉक्टर आयुषी जवाब न देताच निघून गेल्या. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे पुन्हा एकदा भय्यु महाराज आत्महत्या प्रकरणावर चर्चा होताना दिसून येत आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती आणि वळण समोर येत आहे. या प्रकरणाची सुनावणी इंदोरच्या कोर्टात होत आहे. डॉक्टर आयुषी सोमवारी जबाब नोंदवण्यासाठी कोर्टामध्ये गेल्या होत्या. त्याच वेळी त्यांच्या आजोबांचे निधन झाल्याचे फोनवरून समजताच, त्यांनी तशी माहिती न्यायाधीशांना दिली. व त्या तिथून बाहेर पडल्या. 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
12 जून 2018 रोजी स्वतःवर गोळी झाडून भय्यू महाराजांनी आत्महत्या केली होती. संपूर्ण देश भय्यू महाराजांनी केलेल्या आत्महत्येमुळे हळहळला होता. आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली होती. या आत्महत्येनंतर भय्यू महाराजांचे सेवक विनायक दूधाले, शरद देशमुख आणि पलक पुराणीक यांना अटक केली होती. भय्यू महाराजांना आत्महत्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नुकतेच त्यांची मुलगी कुहूने भय्यू महाराजांच्या संपत्तीवर दावा केला आहे. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.